Labels

Tuesday, 29 April 2014

अहिल्याबाई होळकर

(इ.स.१७२५ ते इ.स.१७९५)

अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते व धनगर होते. त्याकाळी स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर व माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.

त्या मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बगत होत्या. मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. मुलाच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. त्यांच्या स्मरणार्थ, इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे.
एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. (इ.स. १७२५ - इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेससलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली.
अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचे इ.स. १७५४ मध्ये, कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. १२ वर्षांनंतर, त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाईंनी आपल्या राज्याला  वाचवले. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.

राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला, आणि महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात.
मल्हाररावांनी तिला प्रशासकीय व सैन्याच्या कामात तिला पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनीने इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले. इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.

"चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्याबाई सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत,असे म्हणतात.

पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली., माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.

भारतीय संस्कृती कोशात अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आह - काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.

अहिल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्याबाईच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्याबाईंनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी तिच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.

भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्याबाईंनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागीर, मूर्तिकार व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील, भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस, माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.
अहिल्याबाई होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हात मिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे तिने नोंदले: " वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
"या इंदूरमधील शास्कांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्याबाईंना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल समाज पहाडातून सामानाची नेआण करत असतांना लुटमार करीत असे. त्यांना त्यातून मुक्ती मिळाली व त्यांना प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी देण्यात आली. सर्व समाजाला अहिल्याबाई आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करत. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे त्यांच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते. वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत निमाली. त्यांची स्मृती अद्यापही टिकून आहे.
भारत स्वतंत्र झाल्यावरही अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्याबाईंची दूरदृष्टी होती.

अहिल्याबाईंचा एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी तिला संताचा दर्जा दिला."

अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. जिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्याबाई ही एक महान स्त्री होती.

"आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्याबाईंनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती. अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.

अहिल्याबाईंच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.
या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे
अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
अमरकंटक(मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अंबा गाव – दिवे.
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर,हरी मंदिर,अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भरतपूर – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भीमाशंकर(महाराष्ट्र) – गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर.
बिठ्ठुर – ब्रह्मघाट
बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
चित्रकूट(उ.प्र.) - श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा
चिखलदा – अन्नक्षेत्र
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घ्रुष्णेश्वर (वेरूळ)(महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
हांडिया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा
हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
जगन्नाथ पुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जामघाट – भूमिद्वार
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी,अहिल्या द्वारकेश्वर,गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे,मंदिरांचे घाट,मनीकर्णिका,दशस्वमेघ,जनाना,अहिल्या घाट,उत्तरकाशी,रामेश्वर पंचक्रोशी,कपीलधारा धर्मशाळा,शितल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी सहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मनसा – सात मंदिरे.
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मिरी (अहमदनगर)(महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
नैम्बार(मप्र) – मंदिर
नाथद्वार – अहिल्या कुंड,मंदिर,विहिर.
निलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य(उ.प्र.) – महादेव मंडी,निमसर धर्मशाळा,गो-घाट,चक्रीतिर्थ कुंड.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहिर.
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,आमलेश्वर,त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जिर्णोद्धार,गौरी सोमनाथ मंदिर,धर्मशाळा,विहिरी.
ओझर (अहमदनगर)(महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर,गोरा महादेव मंदिर,विघ्नेश्वर मंदिर,धर्मशाळा,रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग,होळकर वाडा,सभा मंडप,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास(नाशिक) (महाराष्ट्र)– विहिर.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर,घाट व धर्मशाळा,बगीचा,राजवाडा.
पुणे (महाराष्ट्र)– घाट.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान,श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रामपूरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
साखरगाव (महाराष्ट्र)– विहिर.
संभल (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
सप्तश्रुंगी – धर्मशाळा.
सरढाणा मिरत – चंडी देवीचे मंदिर.
सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर,जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
श्री नागनाथ (दारुकवन) – १७८४ मध्ये पूजा सुरू केली.
श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल,आ.प्र.) – शिवाचे मंदिर
श्री शंभु महादेव पर्वत,शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहिर.
श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जिर्णोद्धार.
श्री विघ्नेश्वर – दिवे
सिंहपूर – शिव मंदिर व घाट
सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
तराना? – तिलभंडेश्वर?शिव मंदिर,खेडपती,श्रीराम मंदिर,महाकाली मंदिर.
टेहारी? (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पुल.
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर,कालियादेह घाट,चिरघाट व इतर अनेक घाट,धर्मशाळा व अन्नछत्र.
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहिर.

सेनापती बापट


पांडुरंग महादेव बापट ऊर्फ सेनापती बापट (१२ नोव्हेंबर  इ .. १८८० - २८नोव्हेंबर  इ .. १९६७ )

त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक आणि बी . . पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. बी.. परीक्षेत इ.. १९०३ साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापिठाची शिष्यतृत्ती मिळवुन त इंग्लंडला गेले एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेज घेतला .
सेनापती बापटांनी लंडन येथील वास्तव्यामध्ये बाँब बनवण्याची कला हस्तगत केली. असे असले तरी हि "माझ्या बाँबमुळे एकही बळी गेला नाही". ते फक्त आमच्या कार्याकडे ल़क्ष वेधण्यास केले गेले होते" असे त्याचे म्हणणे होते. मात्र तरीही त्याना अलिपुर बाँब खटल्यात सहभागी असल्याचा त्यांच्याव‍र आरोप होता. इ.स. १९२१ पर्यत स्वत:च्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवा व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले.

इ.स. १९२१ ते इ.स. १९२४ या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालवले या आंदोलनात कारागृहावासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. संस्थाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी आंदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. आंदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

पुण्यातील १५ ऑगस्ट, इ .. १९४७ साली ध्वजारोहण सेनापती बापटांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे

राघोजी भांगरे


राघोजींचा जन्म महादेव कोळी जमाती झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरीबांना रोखपैश्याची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. सावकार आणि ब्रिटिशांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली.

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला.

इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंतॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे गॅजेटियराच्या जुन्या आवृत्तीत "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले.  त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.  राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरामध्ये सापडतो.

सातार्‍याच्या पदच्यूत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छळ करणाऱ्या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने   राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे.  शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली.  महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती.

भीमाशंकर, वज्रेश्वरी,त्रंबकेश्वर,नाशिक, पंढरपूर येथे बंडाच्या काळात तो देवदर्शनाला गेला होता. तेथे त्याला पकडले. ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता.  त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही.  त्याने स्वतःच बाजू मांडली.
२ मे १८४८ रोजी त्याला फाशी देण्यात आली

प्रमोद कांबळे


प्रमोद कांबळे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९६४ साली झाला. प्रमोद कांबळे यांचे वडिल आणि परिवारातील इतर लोक हे कला क्षेत्रातील असल्यामुळे त्यांना हे कलागुण लहानपणापासुनच मिळाले. त्यांचे वडील हे कला महाविद्यालयात मुख्याध्यापक म्हणुन कार्यारत होते त्यामुळे लहानपणापासुनच त्यांचे कला शिक्षणास सुरुवात झाली. त्यांना ७वी इयत्तेत असताना मुर्तीकले साठी राष्ट्रीय शिशुवृत्ती मिळाली. त्यांनी फाऊंडेशन कोर्स आणि कला शिक्षक डिप्लोमा प्रगत कला महाविद्यालय, अहमदनगर येथुन पुर्ण केला.
प्रमोद कांबळे यांची मुर्तीकार बनण्याची प्रबळ इच्छा त्यांना जे जे स्कुल ऑफ आर्टला घेऊन गेली. जेथे त्यांनी मुर्तीकला आणि मॉडेलिंग डिप्लोमा पुर्ण केला. शैक्षणीक काळात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले तसेच या काळात त्यांनी विविध कला दिगर्द्शका सोबत कामही केले. नंतर त्यांनी अहमदनगर मध्ये येऊन त्यांचा स्टुडिओ सुरु केला.
प्रमोद कांबळे यांनी भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये भारतातील नामवंत ५०० महान व्यक्तींची चित्रे ६५ फुट X १७ फुट अशा एका अहमदनगर महानगरपालिकेच्या महावीर कलादालनातील मोठ्या भिंतीवर काढली आहेत. केवळ पेन्सिलीच्या साहाय्याने १९९७ साली काही महिन्यामध्ये त्यांनी हे जगातील सर्वात मोठे पेन्सिल चित्र पूर्ण केले. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या दिवशी हे चित्र त्यांनी राष्ट्राला अर्पण केले.

झहीर खान

(जन्म ७ ऑक्टोबर १९७८)

झहीर खानचा जन्म ७ ऑक्टोबर १९७८, अहमदनगर जिल्हातील श्रीरामपुर गावी झाला. झहीरची क्रिकेट क्षेत्रातील कारर्किद २००० साली झाली जेव्हा तो पुढील शिक्षणासाठी मुबंईला गेला आणि तिथे त्याने क्रिकेट क्लब मध्ये जाणे सुरु केले. झहीर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे तसेच तो कसोटी क्रिकेट मधील ११व्या नंबरला फलंदाजीस येऊन सर्वात जास्त धावा करणार फलंदाज म्हणुन ओलखले जाते. शारिरीक दुखापतीमळे झहीरला २००३/०४ यासाली क्रिकेट संघातुन वगळण्यात आले. झहीर पहिल्याच वेळेस बांगलादेश विरुध्दच्या ढाका येथे खेळण्यात आलेल्या कसोटी तसेच केनिया विरुध्दच्या नायरोबी येथील एक दिवशीय सामन्यासाठी निवडण्यात आले होते

सदाशिव अमरापुरकर


(गणेश कुमार नरोडे - जन्म १९५६)
सदाशिव अमरापुरकर यांचे खरे नाव गणेश कुमार नरोडे आहे. त्यांचा जन्म १९५६ साली नाशिक येथे एका रिक्षा चालकाच्या येथे झाला. त्यांनी १९७४ साली सदाशिव हे नाव रंगमंचावर येण्याच्या आगोदर ठेवले. ते एक प्रशिकक्षीत गायक होते परंतु वयाच्या १५ व्या वर्षी म्हणजे १९७१ साली त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. १९७६ साली त्यांना आमरस या मराठी चित्रपटात पहिला छोटा रोल मिळाला. १९७९ सालापर्यंत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत छोटे रोल केले. त्यांना बाल गंगाधर टिलक या मराठी चित्रपटात पहिला मोठा रोल मिळाला. त्यानंतर त्यांनी अंजना आर्ट या त्यांच्या पत्नीच्या कंपनी मध्ये निर्माता म्हणुन हि काम केले.

सदाशिव अमरापुरकर यांचा अर्ध सत्य हा १९८३ साली पहिला हिंदी चित्रपट आला, या चित्रपटासाठी त्यांना उत्कॄष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार हि मिळाला तसेच त्यांनी पुर्णा मंदिर, नासुर, मुद्दत, विरुदादा, जवानी इ. चित्रपटात खलनायकाचे महत्त्वपुर्ण काम केले. १९९१ साली आलेल्या सडक चित्रपटातील त्यांच्या भुमिकेला उत्कॄष्ट खलनायक पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्यांनी ऑखे, इश्क, कुली नं. १, गुप्त, आण्टी नं. १, जय हिंद अशा अनेक चित्रपटातुन निरनिराळ्या उत्कॄष्ट भुमिका बजावल्या

पोपटराव पवार





१९९० साली झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत पोपटराव पवारांना गावचे सरपंच म्हणून निवडण्यात आले. त्यांनी सरपंच झाल्यानंतरच्या पहिल्या ग्राम सभेच्या भाषणांतच गावकऱ्यांचे मन जिंकले.
२६ जाणेवारी १९९० साली हिवरे बाजारच्या पहिल्या ग्रामसभेच्या बैठकीत



गावातील मुलभुत गरजा सुधारणे यांवर भर देण्यात आला त्यापुढील प्रमाणे :-
१ पिण्याचे पाणी पुरवीने
२ जनावारासाठी चारा
३ शेतीसाठी पाणी
४ प्राथमिक शिक्षण
५ आरोग्य सुविधा
६ गावासाठी रस्ते
७ विज
८ रोजगार आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम    
गावकऱ्याच्या प्रयत्नामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि गावात पडण्याऱ्या दुष्काळाचा प्रश्न सुटला. हिवरे बाजारातील लोकांनी शेती सिचंनासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरु केला आणि ऊस, केळी यासारखे पाणी जास्त लागणारे पिके घेणे बंद केले.
पावसाचे  पाणी बांध घालुन अडवीणे, शेतात छोटे बांध घालणे, वनीकरण यासारख्या उपायामुळे मॄदा आणि जल संरक्षण यात महत्त्वाचे योगदान दिले. याबरोबरच गावकऱ्यांनी दारुबंदी, परिवार नियोजन, श्रमदान यातून गावात सामाजिक बदलही घडवून आला आहे, यामुळे गावातील लोकांचे कामाच्या शोधात शहरात जाणे बंद झाले आहे. सध्या गावात पानी, स्वास्थ्य, आणि गावकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
श्री पोपटराव पवार यांच्या प्रयत्नामुळे गावची छबी जनमाणसात उंचावली तसेच गावातील कलह ही संपले आहेत. श्री पोपटराव पवार हे १९८९ सालापासून सलग गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून येत आहेत.

गायराण चरण्यावर बंदी, वॄक्षतोड बंदी तसेच दारुबंदी तेथील पर्यावरणाचा तसेच लोकांचाही विकास झाला आहे. हिवरे बाजारतील लोकांनी गाव जमिन बाहेरच्या लोकांना न विकणे तेसेच लग्ना आगोदर HIV/AIDS ची तपासणी करणे हा निर्णय संगणमताने घेतला आहे.
हिवरे बाजार गावाला महाराष्ट्र शासनाने "आदर्श ग्राम" पुरस्कार देऊन नावाजले आहे

अच्युतराव पटवर्धन

(५ फेब्रुवारी इ. स. १९०५ - ५ ऑगस्ट इ. स. १९९२)
अच्युतराव पटवर्धन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी, अर्थतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत व समाजवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक होते .
नगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते.
पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले.
१९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाही.
अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण प्रभुतींनी १९३४ साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला काही थारा मिळणार नाही हे उमगल्याने त्यांनी १९४७ साली भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला

Monday, 28 April 2014

अण्णा हजारे

किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे
(१५ जून इ.स. १९३७ : भिंगार)
मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे  किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ महाराष्ट्रीय समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुदध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्राच्या अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
किसन हजारेंचा जन्म जून १५, इ इ.स. १९३७ रोजी  भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५ मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी सुरुवातीला भिंगारमध्येच बस्तान बसवले, पण नंतर १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनला सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावले.
.. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले. औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३ मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.
त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूण एक जवान शहीद झाले.  हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मीतीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले. हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली. यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले. या क्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला. १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.
लष्कर सोडल्यावर हजारे राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या आहे. जवळजवळ कायमच्या दुष्काळी प्रदेशात असलेल्या या दुर्लक्षित गावात त्यावेळी गरिबी आणि निराशेचा सुकाळ होता. हजारेंनी ग्रामस्थांसह अनेक दशके अथक प्रयत्न करून गावाचा कायापालट केला. आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गावातील परिस्थिती सुधारली. तंत्रज्ञान किंवा औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यांवर त्यानी गावातील गरिबी दूर करण्यात यश मिळवले. अण्णांनी गावातील युवकांना संघटित केले व तरुण मंडळाची स्थापना केली. यादवबाबा मंदिरात सर्वांना दारू न पिण्याची शपथ देण्यात आली. मद्यपींना मंदिराच्या खांबाला बांधून तरुणांनी फटकेही मारले व त्याचाच परिणाम म्हणून व्यसनाधीन राळेगण व्यसनमुक्त झाले.
अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराचा निपटारा करण्याकरिता वेळोवेळी आंदोलने केली व प्रसंगी कारावासही स्वीकारला. १९८० पासून आतापर्यंत अण्णा हजारे यांनी १६ उपोषणे केली आहेत. प्रत्येक वेळी सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले. त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. अण्णाची १६ पैकी १३ उपोषणे ही महाराष्ट्र सरकारच्या विरोधातील तर ३ उपोषणे केंद्र सरकारच्या विरोधात करण्यात आली आहेत.
हजार्‍यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकार या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.
यांतील १५वे आणि १६वे उपोषण हे जनलोकपाल विधेयकासाठीचे होते. अण्णांनी एकूण आतापर्यंत ११६ दिवसापेक्षा जास्त काळ उपोषण केले आहे. अण्णाच्या या उपोषणांमुळे आणि आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला ४५० अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली तर ६ मंत्र्यांना आपले पद गमवावे लागले आहे.

सप्तशृंगी देवी



सप्तशृंगी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे . तो नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे . हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे . ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते . आदिशक्तीचे मूळ स्थान आहे असे मानले जाते . देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे . येथील गाभार्‍याला शक्तिद्वार , सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत . या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.
देवीची मूर्ती ८ फूट उंचीची आहे . ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे . येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत . देवीला अकरा वार साडी लागते व चोळीला तीन खण लागतात डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे . तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे . कमरपट्टा , पायात तोडे, असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात .
सप्तशृंग येथे वास्तव्य करणारी करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे . दंडकारण्यात राम -सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते . ऐतिहासिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले, अशी आख्यायिका आहे . तसेच महानुभावी लीळाचरित्रात असा उल्लेख आढळतो की राम-रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्च्छा येऊन पडला . त्या वेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंग गड होय . नाथ संप्रदायातील नवनाथांना शाबरी विद्या प्रत्यक्ष देवीने दिली असेही नोंदवलेले आढळते . निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती . शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भ बखरींमध्ये नोंदवलेला आढळतो . देवी भागवतात देवीची देशात १०८ शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे.
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीच असतो. सोबतीला खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो.

श्री रेणुकामाता (माहूरगड)



देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. आख्यायिका-
एका कथेनुसार, माता पार्वतीने कुब्ज देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला . तिचे नाव रेणू असे ठेवण्यात आले . शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषीबरोबर तिचे लग्न झाले . जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत असत . सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती . राजा सहस्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली . ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही . तेव्हा पराक्रमी जमदग्नीपुत्र परशुराम आश्रमात नाही , हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला . आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली .नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला . घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर आला . तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली व ' इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर ' असे सांगितले . परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले . या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले . यावेळी माता रेणुका सती गेली . या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रेयांनी केले .

त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो दु:खी होऊन शोक करत होता, तोच आकाशवाणी झाली . ' तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल . फक्त तू मागे पाहू नकोस .' परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले . या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ' मातापूर ' म्हणू लागले . शेजारच्या आंध्रप्रदेशात ' ऊर ' म्हणजे गाव ते ' माऊर ' आणि पुढे ' माहूर ' झाले..!!

श्री महालक्ष्मी मंदिर,कोल्हापूर




महालक्ष्मी मंदिर पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. मंदिराच्या मांडणीवरुन ते चालुक्यांच्या काळात इ.स. ६०० ते ७०० मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे.या देवस्थानाची महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत गणना होते.
मुसलमानांनी देवळाचा विध्वंस केला तेव्हा मूर्ती अनेक वर्षे पुजाऱ्याने लपवून ठेवली होती . पुढे



छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ .. १७१५ ते १७२२ या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले . त्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा .

महालक्ष्मी ही विष्णूची भार्या व म्हणून समोर गरुडमंडपात विष्णुवाहन गरूडाची स्थापना केली आहे. तर मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे.देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग आहे.

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले हे निश्‍चितपणे सांगता येत नसले तरी ख्रिस्तोस्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकूट नॄपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तीच्या निवार्णार्थ आपल्या डाव्या हाताची अंगुली महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्याचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय हे शिलाहारांपूर्वीच करहाटक (कऱ्हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्‍तिपीठ म्हणून प्रसिद्ध पावले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्‍त होते. आपणास देवीचा "वरप्रसाद" मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो.

काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर -चालुक्यांच्या काळात आहे. देवळाच्या मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे . देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्‍वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात . या उलट जैन पंथियांचा असा दावा आहे की, हे देऊळ मूळचे जैन देवता पद्‍मावतीचे आहे आणि त्याचे शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले . मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आली आणि पुढे इ .. १७२२ मध्ये दुसऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली . ही प्रतिष्ठापना करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सिधोजी हिंदूराव घोरपडेला पन्हाळयाहून कोल्हापूरास रवाना केले होते . हे देवालय आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे . प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी, दरजा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठमोठया चौकोनी किंवा आयताकॄती दगडात करण्यात आलेली आहे . देऊळ पश्‍चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे . पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजाशिवाय उत्तर , पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत . उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजविली जाते . या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात . देवळात वारा येण्याला कोठेही गवाक्षे नाहीत . पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोटया घुमटांखाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मूर्ती आहेत . महालक्ष्मीची मूर्ती .२२ मीटर उंच असून ती एका ० .९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आलेली आहे . देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात . आश्‍विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा करतात.

प्रवेशद्वारानंतर मुख्य मंडप दॄष्टीस पडतो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला कोनाडे असून त्यामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम असलेल्या मूर्ती बसविलेल्या आहेत. यापैकी प्रमुख मूर्ती म्हणजे तथाकथित भरत आणि शत्रुघ्न यांच्या होय. या मूर्तीबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत. या मंडपातून मणि मंडपाकडे जाता येते. या मंडपाच्या पाठीमागील भिंतीच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या दोन सुंदर मूर्ती आहेत. या द्वारपालांना जय आणि विजय अशी नावे असून त्या मूर्ती (३.०५ मी.उंच) लढाऊ पवित्र्यामध्ये कोरण्यात आलेल्या आहेत. मणि मंडपामधून महालक्ष्मीची मूर्ती ज्या आतील गाभाऱ्यात आहे त्या ठिकाणी जाता येते. त्या ठिकाणी बंदिस्त केलेला मार्ग असून पूर्वी तेथे काळोख होता. देवीला प्रदक्षिणा घालण्याऱ्या भाविक लोकांना त्रास होवू नये म्हणून विजेचे दिवे लावलेले आहेत. गाभाऱ्याच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना तसेच गाभाऱ्यात व मणि मंडपात संगमरवरी फरशी बसविलेली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीला बरेच मजले असून त्या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती असलेल्या जागेच्या वरच्या बाजूस एक लिंग आहे. मुख्य देवळाच्या बाहेरील बाजूला अप्रतिम कोरीव काम आहे. थोडया थोडया अंतरावर कोनाडे असून प्रत्येक कोनाडयामध्ये काळया दगडात कोरलेल्या स्वर्गीय वादक आणि अप्सरांच्या मूर्ती आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले त्या बांधकामाला एक लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. ज्याला गरुड मंडप किंवा सभा मंडप म्हणतात. तो इ.स. १८४४ ते इ.स. १८६७ या दरम्यान बांधण्यात आला. महालक्ष्मीच्या मुख्य देवळाभोवती दत्तात्रय, विठोबा, काशीविश्‍वेश्‍वर, राम आणि राधा कॄष्ण अशी इतर लहान मोठी देवळे आहेत. देवळाच्या सभोवारच्या मोकळया जागेत फसरबंदी केलेली आहे. सभामंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्वी एक एक कुंड होते आणि त्यात कारंजे होते. या कुंडामध्ये भाविक लोक धार्मिक विधी करीत.

देवळाच्या निरनिराळया भागात चार देवनागरी शिलालेख कोरलेले दिसतात. दत्त मंदिराच्या पाठीमागे असलेल्या हरिहरेश्‍वराच्या देवळाच्या भिंतीवर शके ११४० मध्ये कोरलेला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख देवळाच्या पटांगणात प्रवेश करताना डाव्या बाजूला असलेल्या एका खांबावर असून तो शके ११५८ चा आहे. तिसरा शिलालेख मुख्य देवळाच्या डाव्या बाजूला असलेल्या नवग्रहांच्या छोटया देवळातील एका खांबावर आहे, आणि चौथा शिलालेख मुख्य देवळाच्या पाठीमागे असलेल्या शेषशायी मंदिराच्या डाव्या बाजूला आहे. हा शिलालेख आपल्याला पूर्वेकडे असलेल्या दरवाजामधून प्रवेश करताना लागतो.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात. त्यात पुण्या-मुंबईहून जाण्याऱ्यांची संख्या मोठी असते. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी एकंदर २० पुजारी आहेत. प्रत्येक शुक्रवारी देवळाच्या पटांगणात पालखीमधून देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. वर्षातून तीन वेळा उत्सव करण्यात येतो. त्यापैकी पहिला उत्सव चैत्र पौर्णिमेला होतो.या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालखी मध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते. दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या दिवशी. या दिवशी कोल्हापूरपासून ४.८३ कि. मी. वर असलेल्या टेंबलाईच्या देवळापर्यंत महालक्ष्मीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक नेण्यात येते. त्यावेळी कसबा बावडा गावाचा जो प्रमुख असतो त्याच्या अविवाहित मुलीकडून टेंबलाईला कोहळयाचा नैवेद्य दाखवला जातो. अश्विन पौर्णिमेला दिवे आणि ज्योती लावून देवळाची आरास करण्यात येते आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो.

तुळजापूरची तुळजाभवानी माता

तुळजाभवानी

उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे . देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही . महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे . स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय . या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली . देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे . भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते . मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे .

तुळजापूरची तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, नवरात्रात नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते. नवरात्राच्या नऊ माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा २१ दिवसांचा असतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेस होत असली तरीही तत्पूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीस सायंकाळपासून सुरू होतात. देवीची प्रत्यक्ष मूर्तीची शेजघरातील निद्रा वद्य नवमीस सायंकाळी सुरू होते. वरात्रापूर्वी देवीची शेजघरातील निद्रा असते.

तुळजाभवानी मातेचे स्थान बालाघाट म्हणजेच यमुनाचलावर वसलेले आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिर तसेच पूर्णतः खोलगट भागात असून, सुरक्षेच्या भौगोलिकदृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी उताराच्या दृष्टीने जावे लागते.

मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणजेच पूर्वीचे अंधारकुंड असे नाव प्रचलित होते. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येते. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापाठीमागे दत्तपादुका आहेत. त्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरवात करताना गणेशदर्शन करणे हे पुराणातून सांगितले आहे. त्यामुळे गणेशदर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमांडपंती आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे.

तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब - रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते अश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णतः दगडी बांधकाम केलेले आहे. साधारण बारा फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्‍चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.

तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राच्या मर्यादित नव्हते, हे आजही स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे.पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रूप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे.

तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे. देवीच्या मंदिराकडे जाताना पुरातन ओवरीचे स्थान आहे. मंदिराप्रमाणेच खोल परिसर असून, तेथेही तीर्थकुंड आहे. या ठिकाणी आजही रहिवासी आहेत. पूर्वी तुळजाभवानीचे स्थान अनेक कडव्या धर्मविरोधकांचे लक्ष असणारे स्थान असल्याने, या ठिकाणी मंदिराप्रमाणे व तत्सम स्थान राहावे यासाठी हे स्थान निर्माण केले असून, अनेक आक्रमणांच्या वेळी देवी त्या ठिकाणी वास्तव्यास होती, असे सांगण्यात येते.

मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कुटुंबीय मूलतः मुरूम ता. उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर - पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घराची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरूपी असतात. नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.नगरचे भगत (तेली) कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे ४५ पिढ्यांपासून ही प्रथा चालू आहे, असे सांगण्यात येते. भिगारच्या पलंगावर देवीची पाच दिवस निद्रा असते. सार्वत्रिक सीमोल्लंघनाच्या वेळी तुळजाभवानी निद्रेत असते. त्यानंतर अश्विनी पौर्णिमेला मोठी यात्रा होते.

आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहादूर संस्थानचे कार्य कोल्हापूरच्या राजे छत्रपतीचे देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक नावे आहेत.

राज्यात तुळजाभवानी माता हे पहिले पूर्णपीठ आहे. याशिवाय माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ आहे. देवी ही सौदर्यवाहिनी आहे. भाळी गंध त्यावर सुवर्णअलंकाराने घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागदागिने यामुळे तुळजाभवानीचे रूप भाविकांना मोहून टाकते

नाथ संप्रदाय


navnath
  • मच्छिंद्रनाथ
  • गोरखनाथ
  • जालंदरनाथ
  • कानिफनाथ
  • चरपटीनाथ
  • नागनाथ
  • भर्तरीनाथ
  • रेवणनाथ
  • गहिनीनाथ

मच्छिंद्रनाथ
मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ (जीवनकाळ : ..चे वे शतक - इ ..चे १० वे शतक ) नवनाथांपैकी एक सिद्ध, योगी होते . ते गोरक्षनाथांचे गुरू होते . मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ ही गुरू -शिष्य द्वयी हठयोगाचे प्रवर्तक असल्याचे मानले जाते . कौल मताचे व हठयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौलज्ञाननिर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते . हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्ममतांच्या सिद्धपरंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते . मध्ययुगातील भक्तिचळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणाऱ्या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात .


गोरखनाथ
मच्छिंद्रनाथ हे भारतभर भ्रमण करीत असत. असे फिरत असतांना ते एका घरी भिक्षा मागण्यास गेले. या घराला सगळे काही असले तरी संतती नव्हती. दारी एक तेज:पुंज साधू आलेला पाहून घरातल्या स्त्रीने भिक्षा वाढतांना आपल्याला मूल व्हावे असा आशीर्वाद मागितला. त्यावर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला एक चिमूटभर भस्म दिले आणि आशीर्वाद दिला, की मुलगा होईल.
स्त्री हरखून गेली व तिने शेजारी-पाजारी जाऊन सांगितले की, भिक्षा मागायला आलेल्या साधूंनी मला हे भस्म दिले आहे आणि आता मलाही तुमच्या सगळ्यांसारखा मुलगा होणार. हे ऐकून शेजारी पाजारी हसू लागले. त्यामुळे शरमून जाऊन त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या ढिगावर टाकून दिले.
बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत तेथेच भिक्षा मागण्यास आले. परत तीच स्त्री भिक्षा देण्यास आली. तिला पाहून मच्छिंद्रनाथांनी विचारले की, मुलगा कसा आहे? तर स्त्री म्हणाली की मूल झालेच नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले की असे होणेच शक्य नाही. त्यावर तिने घडलेले सर्व कथन केले. मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरख!" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हाच मुलगा पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आला.
गोरक्षनाथांनी योग प्रकार जनमानसात रुजवला. त्यासाठी भारतभर भ्रमण केले. यावर त्यांनी लिहिलेली पुस्तके पुढील प्रमाणे
  1. गोरक्ष संहिता
  2. सिद्ध सिद्धान्त पद्धती
  3. योग
  4. मार्तंड
  5. योग सिद्धान्त पद्धती
  6. योग बीज
  7. योग चिंतामणी
गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतावरच नाही तर अरब जगतातही होता. साचा:संदर्भ
कानाला भोके पाडण्याची पद्धतीही गोरक्षनाथांनी सुरू केली. अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हटयोगाची साधना करावी लागे. हे साधू अवधूत असत.
सर्व नाथपंथीय जरी शिवापासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, नाथ संप्रदाय अद्वैतवादी आहे. ता अणि स्व ला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे असे मूलतः मानणारा आहे असे समजले जाते. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच साधला जातो.
गोरखनाथांनी गहिनीनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा दिली.

निवृत्तिनाथ
एकनाथांप्रमाणेच निवृ​त्तिनाथ हे एक प्रसिद्ध नाथपंथीय होते. संत ज्ञानेश्वर हे त्यांचे धाकटे भाऊ. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
गैनीनाथ वा ग​हिनीनाथ हे ​निवृत्तिनाथांचे गुरू होते. ‘निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय । ग​यिनीनाथे सोय दाख​विली ॥’, असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठे​विले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना, ​निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि निवृ​त्तिनाथांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले व आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले’ असे निवृ​त्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ ‌‌‌त्यांच्या सोबत होतेच.निवृत्तिदेवी, निवृ​त्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृ​त्तिनाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा. म. आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे

भवानी तलवारीचे गूढ

भवानी तलवारीचे गूढ
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार कुठे आहे, हा एक मोठा गूढ प्रश्‍न आहे. लोकमान्य टिळकांच्या काळापासून हा प्रश्‍न अधूनमधून चर्चेत येतोच, त्यावरून रान पेटते आणि मग तो पुन्हा बासनात जातो, असे घडताना दिसत आहे. इंग्लंडमध्ये बकिंगहॅम राजवाड्यात भवानी तलवार आहे, अशी एक समजूत आहे. लोकमान्य टिळकांनी ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करणारी एक कविता गोविंदग्रजांनी (राम गणेश गडकरी) लिहिली होती. 1980 मध्ये बॅ. अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना, तर त्यांनी भवानी तलवार महाराष्ट्रात आणणारच अशी घोषणा करून मोठी मौज केली होती. त्यासाठी त्यांनी लंडनवारीही केली होती. तिकडून त्यांनी भवानी तलवार नाही आणली, पण तिचे चित्र तथाकथित चित्र मात्र आणले. यानंतर भवानी तलवार पुन्हा चर्चेत आली ती केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा जून 2002 मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवानी स्पेनच्या पाच दिवसीय भेटीवर गेले होते. त्यावेळी स्पेनमधील काही संशोधकांनी सांगितले, की शिवाजी महाराजांची भवानी तलवार स्पेनमधील तोलेदो या शस्त्रास्त्रे निर्मितीसाठी नावाजलेल्या शहरातील कारागिरांनी तयार केली होती. त्यावरून काही काळ धुरळा उडाला. मग तो विरून गेला.
बखरी आणि काव्यांनुसार साक्षात्‌ तुळजाभवानीने शिवरायांना तलवार दिली, ती ही भवानी तलवार. तुळजाभवानीने महाराजांना दर्शन दिले आणि "राजा, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे' असे म्हणाली, असे "शिवभारत' या काव्यामध्ये नमूद आहे. महाराजांकडे अनेक तलवारी होत्या. त्यातील एक त्यांनी शहाजीराजांनी दिली होती. तिचे नाव त्यांनी "तुळजा' असे ठेवले होते. महाराजांच्या दुसऱ्या एका तलवारीचे नाव "जगदंबा' असे होते. महाराज भवानीचे भक्त होते. तेव्हा अन्य एखाद्या तलवारीला त्यांनी "भवानी' असे नाव दिले असेल. यात काही वाद नाही. वाद आहे तो हा, की सध्या ही तलवार कुठे आहे?
सुमारे नव्वदेक वर्षांपूर्वी मुंबईतील कॅप्टन बहादुर मोदी नावाच्या गृहस्थांनी भवानी तलवार आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. तशी एक पुस्तिकाही त्यांनी प्रसिद्ध केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, खान बहादुर पदमजी यांच्याकडे भवानी तलवार होती व ती त्यांनी डॉ. कूर्तकोटी यांना दिली. नंतर ती त्यांच्या स्वतःकडे आली. या तलवारीवर "छत्रपती शिवाजी' असे कोरलेले होते. नंतर उघडकीस आले, की तो मजकूर या पदमजी नावाच्या इसमानेच कोरलेला होता!
इंदूर-महू येथे असलेली तलवार हीच भवानी तलवार आहे व ती महाराजांनी छत्रसाल बुंदेल्याला दिली होती, असा दावा काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहाससंशोधक सेतुमाधवराव पगडी यांनी केला होता. परंतु त्या तलवारीवर नंतर छत्रसालाच्या सेनापतीचे नाव आढळून आले!
असाच आणखी एक दावा केला जातो, की खेम सावंताकडून महाराजांना पोर्तुगीज बनावटीची तलवार मिळाली व तीच भवानी तलवार होय. वस्तुतः ही भाकडकथा आहे. खेम सावंत हा कोणी महाराजांचा एकनिष्ठ पाईक नव्हता. आदिलशाहीचा हा वतनदार, दगलबाज होता. महाराजांनी त्याचा बिमोड करण्यासाठी त्याच्या मुलखावर हल्ला केला होता. क्षणभर असे मानले, की शरणागती पत्करल्यानंतर त्याने महाराजांना जे नजराणे धाडले, त्यात ही पोर्तुगीज बनावटीची तलवारही होती, तरी महाराज त्या तलवारीवरील रोमन अक्षरे तशीच ठेवून तिला "भवानी' तलवार असे म्हणणार नाहीत.
रियासतकारांच्या म्हणण्यानुसार, रायगड्या पाडावानंतर औरंगजेबाच्या हाती भवानी तलवार लागली. ती त्याने शाहू महाराजांना त्यांच्या विवाहप्रसंगी भेट दिली. याचा अर्थ असा होतो, की भवानी तलवार सातारच्या छत्रपतींकडे आहे. सध्या ती उदयराजे भोसले यांच्या ताब्यात आहे. 1974 साली बाबासाहेब पुरंदरे यांनी मुंबईत "शिवसृष्टी' प्रदर्शन भरविले होते. तेव्हा त्यांनी सातारच्या राजघराण्यातील तलवार भवानी तलवार असल्याचे सांगून मिरवली होती. परंतु ज्येष्ठ इतिहाससंशोधक ग. ह. खरे यांनी ही तलवार आधीच पाहिलेली होती. ती त्यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर पुन्हा एकदा डोळ्यांखालून घातली. खरे यांनी पुरंदरे यांना त्यावरील कोरीव मजकूर दाखवून ही तलवार भवानी नव्हे असे स्पष्ट केले. त्या तलवारीवर "सरकार राजा शाहू छत्रपती कदिम' असा उल्लेख होता.
1875 मध्ये इंग्लंडचे राजपूत्र, प्रिन्स ऑफ वेल्स सातवे एडवर्ड इकडे आले होते. त्यावेळी कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरच्या शस्त्रगारातील "तुळजा' व "जगदंबा' या दोन तलवारी नजर केल्या. यापैकी कोणतीही भवानी तलवार नव्हे. कोल्हापूरच्या राजघराण्याकडे अशी कोणती भवानी तलवार असती, तर ती त्यांच्या देवघरात पूजेत असती. ती त्यांनी कोणास नजराणा म्हणून दिली नसती. पण मुदलातच कोल्हापूर किंवा सातारा येथील राजघराण्यांच्या याद्यांमध्ये भवानी तलवारीचा उल्लेखही नाही.
बकिंगहॅम राजवाड्यातील दोन्ही तलवारी पोतुगीज बनावटीच्या आहेत. इतिहासकार वा. सी. बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांनी त्या पाहून, त्यातील एकही भवानी तलवार नसल्याची खात्री दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना बकिंगहॅम राजवाडा व अन्य म्युझियम्समधील तलवारींची तपासणी करण्याची परवानगी नानासाहेब गोरे यांनी ते भारताचे इंग्लंडमधील हायकमिशनर असताना मिळवून दिली होती. त्या तलवारीवर अद्याप रोमन लिपीत "जे. एच.एस.' अशी अक्षरे आहेत. इतिहासकार ग. ह. खरे यांच्या मते, ती जीजस ह्युमॅनन साल्वादोर या पोर्तुगीज नावाची अद्याक्षरे आहेत. ब्रिटिश म्युझियमेच डेप्युटी कीपर डग्लस बॅरेट यांनी, इंग्लंडमधील कोणत्याही म्युझियममध्ये शिवाजी महाराजांची भवानी तलवार नाही, असे 1969 साली कळविले होते.
भवानी तलवार कशी होती, हे कुणालाच माहित नाही. ग. ह. खरे सांगतात, "भवानी तलवारीचे प्रमाणभूत वर्णन आजही उपलब्ध नाही. परमानंदाच्या शिवभारतात आणि हरि कविच्या शंभुराजचरित्रात हिचा निर्देश आला असला, तरी त्यात हिची लांबी, रुंदी, धार, मूठ, पाते, पोलाद, तीवरील चिन्हे, जडाव वगैरेचे काम इत्यादी तपशील दिलेला नाही. शिवाय परंपरागत अशीही माहिती उपलब्ध नाही. म्हणून आज एखाद्याने एखादी तलवार पुढे आणून ती "भवानी' असल्याचे सांगितले, तर त्याचे तोंड बंद करणे शक्‍य नाही. तरीही इतिहास हे पुराव्याचे शास्त्र असल्याने आणि असा पुरावा त्या व्यक्तीस देता येत नसल्याने तञ्ज्ञ त्याच्या शब्दास कधीच मान्यता दाखविणार नाहीत.''




संदर्भ -
- इतिहास सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998, पृ. 132-133.
- "भावनांशी खेळ नको!' (29-11-1980) व "पुन्हा एकदा भवानी' (8-12-1980) हे गोविंदराव तळवलकर यांचे "महाराष्ट्र टाइम्स'मधील अग्रलेख