१९९० साली झालेल्या ग्रामसभेच्या बैठकीत पोपटराव पवारांना गावचे सरपंच म्हणून निवडण्यात आले. त्यांनी सरपंच झाल्यानंतरच्या पहिल्या ग्राम सभेच्या भाषणांतच गावकऱ्यांचे मन जिंकले.
२६ जाणेवारी १९९० साली हिवरे बाजारच्या पहिल्या ग्रामसभेच्या बैठकीत
गावातील मुलभुत गरजा सुधारणे यांवर भर देण्यात आला त्यापुढील प्रमाणे :-
१ पिण्याचे पाणी पुरवीने
२ जनावारासाठी चारा
३ शेतीसाठी पाणी
४ प्राथमिक शिक्षण
५ आरोग्य सुविधा
६ गावासाठी रस्ते
७ विज
८ रोजगार आणि सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम
गावकऱ्याच्या प्रयत्नामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि गावात पडण्याऱ्या दुष्काळाचा प्रश्न सुटला. हिवरे बाजारातील लोकांनी शेती सिचंनासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरु केला आणि ऊस, केळी यासारखे पाणी जास्त लागणारे पिके घेणे बंद केले.
पावसाचे पाणी बांध घालुन अडवीणे, शेतात छोटे बांध घालणे, वनीकरण यासारख्या उपायामुळे मॄदा आणि जल संरक्षण यात महत्त्वाचे योगदान दिले. याबरोबरच गावकऱ्यांनी दारुबंदी, परिवार नियोजन, श्रमदान यातून गावात सामाजिक बदलही घडवून आला आहे, यामुळे गावातील लोकांचे कामाच्या शोधात शहरात जाणे बंद झाले आहे. सध्या गावात पानी, स्वास्थ्य, आणि गावकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे.
श्री पोपटराव पवार यांच्या प्रयत्नामुळे गावची छबी जनमाणसात उंचावली तसेच गावातील कलह ही संपले आहेत. श्री पोपटराव पवार हे १९८९ सालापासून सलग गावचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून येत आहेत.
गायराण चरण्यावर बंदी, वॄक्षतोड बंदी तसेच दारुबंदी तेथील पर्यावरणाचा तसेच लोकांचाही विकास झाला आहे. हिवरे बाजारतील लोकांनी गाव जमिन बाहेरच्या लोकांना न विकणे तेसेच लग्ना आगोदर HIV/AIDS ची तपासणी करणे हा निर्णय संगणमताने घेतला आहे.
हिवरे बाजार गावाला महाराष्ट्र शासनाने "आदर्श ग्राम" पुरस्कार देऊन नावाजले आहे
No comments:
Post a Comment